विषमुक्त शेती कमी खर्चात पिकवा

  • गांडुळे म्हणजे जिवंत खत कारखाना. आपल्या शेतजमिनीत  गांडुळे आहेत?  एक चौरस फूट जागेत सरासरी २ गांडुळे असतील आणि वर्षभर किमान १०० दिवस शेतजमीन ओली असेल तर, एक एकर जमिनीत ९० टन खतवड माती हे कारखानदार तयार करून देतात शिवाय १ गांडूळ रोज २० भोके पाडून जमिनीत आवश्यक वायुविजन निर्माण करण्यास मदत करते.
  • सेंद्रिय कर्ब (पालापाचोळ्याचा कोळसा ) जमिनीच्या वरच्या २० सें. मी. थरात १०% पर्यंत वाढवत रहा.
  • शेणखत, लेंडीखत कोंबडीची विष्ठा यांचा सुयोग्य वापर करा.
  • पावसाळ्यानंतर द्यायचे पाणी तुषार सिंचन पद्धतीने सकाळ/संध्याकाळ द्या.
  • मिश्र पिक पध्दती अवलंबा.
  • पारंपारिक बी बियाणी वापरा, वाढवा, जतन करा. निवड पध्दतीने आपलेच बियाणे सुधारता येते. या गोष्टीं मुळे रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि झालाच तर नगण्य असेल.
  • फळमाशी नियंत्रण :  तुळशीची ताजी पाने चूरडून कापसाचा बोळा भिजवावा. कामगंध सापळ्यासाठी त्याचा वापर करावा. कामगंध सापळा शेताच्या  बांधावर टांगावा. शेताच्या/बागेच्या मध्ये टांगू नये.
  • अळी आणि भुंगे नियंत्रण : लाकडाची राख २५ ग्रॅम, चुना (भुकटी) २५ ग्रॅम ४ लीटर पाण्यात विरघळून गाळून फवारणे.
  • भुरी व तांब रोग नियंत्रण : लाकडाची राख २० ग्रॅम, तक ५० मिलि, १ लीटर पाणी हे मिश्रण २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणे.
  • चुरडा मुरडा रोग नियंत्रण : १ लिटर  आंबट ताक, १० लिटर पाणी हे मिश्रण आठ दिवस झाकण ठेवून मुरवून वापरावे.
  • मावा तुडतुडे व अळी नियंत्रण : १ किलो रीठा ठेचून २० लिटर पाण्यात उकळावा. हे मिश्रण गार करून गाळून पाण्यात मिसळून  फवारावे. (फवारताना फेस येणार नाही इतके पातळ करावे).
  • हुमणी नियंत्रण : वेखंड २.५ किलो, २ लिटर पाणी उकळून १.५ लिटर करा. तयार काढा २०० लिटर पाण्यात मिसळून ते जमिनीवर शिंपडा.
  • बुरशी नाशक : १ लिटर गायीचे ताजे दुध १० लिटर पाणी उत्तम बुरशी नाशकाचे काम करते.