आंब्याच्या झाडाच्या बुंध्या पासून साधारणतः १मीटर त्रिज्येच्या वर्तुळात काम करणारी मुळे नसतात. तेथून पुढे १ मीटर म्हणजे २ मीटर त्रिज्येच्या वर्तुळाच्या आतील भागात मुळे कार्यरत असतात. हा भाग समपातळीत ठेवावा. हा भाग समपातळी केल्या नंतर तो भाग खणु नये. पाला,पाचोळा याचे आच्छादन कायम ठेवावे. या भागात च खते द्यावीत.
शेण खताचे अनेक फायदे आहेत, ते आवश्यकच आहे.
फॉस्फेटस् दिल्याने स्पॉन्जी टिश्युचे प्रमाण नियंत्रणात येते.
कॅल्शीयम ऊष्ण वातावरण सहन करण्याची शक्ती वाढवते.
सिलीकॉन्स मुळे पेशींच्या सालीला कडकपणा प्राप्त होतो त्या मुळे किडी पासून संरक्षणात मदत मिळते.
पालवी व मोहोर येताना खतांची आवश्यकता वाढते.
कोणत्याही झाडांच्या मुळांच्या क्षेत्रात आपण वाफसा स्थिती कायम कशी राखतो हे खूप महत्वाचे.
सर्वात महत्वाचे सूर्य गोळा करणे, कारण ९७% भाग प्रकाश संश्लेषणाने बनतो.
माणुस आणि झाड हे लेखक श्री. निळू दामले यांचे राजहंस प्रकाशनाचे पुस्तक अवश्य वाचा.
सौजन्य: विनायक महाजन (काका).