एक आढावा
दि. ६ जून आडे गांवचे सुपुत्र श्री. अशोकराव बेहरे पुणे यांचा फोन आला “मी तुझे खात्यावर पैसे पाठवितो आहे त्याची रोख रक्कम घेऊन आडे,पाडले, केळशी, गांवात जा आणि गरजूंना रोख रक्कम दे. तसेच कुडावळे येथील गरजुंना पण रोख रक्कम देऊन मदत कर.” आडे त्यांचे गांव व कुडावळेत बेहरे आंबा बाग आहे म्हणून आपत्कालीन मदतीचा हात. दि. ७ जूनला रू. २ लाख खात्यावर जमा ही झाले.
माझे घर व कारखान्याचे छप्पर उडालेले ते दुरूस्तीचे काम सुरू होते. समोरच असणाऱ्या बेहरे बागेचे व्यवस्थापन ही मीच पहातो. तेथील एक घर व पॅक हाऊचे पत्रे उडालेले, सुमारे १०० कलमांचे नुकसान झालेले.आडे, केळशी परिसरातील फोन बंद. वीज पुरवठा बंद.
आडे परिसरात गरजवंतास मदत वाटप तेही रोख स्वरूपात हे माझे एकट्याचे आवाक्या बाहेर. दापोलीचे श्री. राहूल मंडलीक यांचे शी संपर्क केला व दोघांनी आडे येथे जागाचे ठरले.
रोख रक्कम घेऊन दि. ९ ला निघालो, आडे येथील श्री. प्रकाश जोशी व श्री. अजित बेहरे यांचे सहकार्याने सहा जणांना व श्री. राहूल मंडलीक यांचेकडे आलेली रोख मदत पोहोचवली व ऊर्वरित मदत वाटपासाठी लाभार्थीची निवड श्री. अजित बेहरे आणि मित्र मंडळाने करून ठेवायची व पुन्हा दोन दिवशी आडे, केळशी मदत वाटप करण्याचे ठरले.
ही गोष्ट दि.९ जून ची श्री. राहूल मंडलीक यांचे मुलांचा वाढदिवसाच्या दिवशीची. तरीही शांतपणे आमचे मदत वाटप पूर्ण करून च आम्ही परतलो.
आडे, पाडले, आंजर्ले परिसरातील वादळाचे भीषण तांडव पाहून आम्ही हबकून गेलो. माझे वैयक्तिक झालेले नुकसानाचा विसर पडला. स्वतःच्या बेहरे बागेचे नुकसान झालेले असताही पीडितांना तात्काळ रोख रक्कम पोहचविण्याची श्री. अशोकराव बेहरे यांनी दिलेली जबाबदारी पार पाडत असतांना उध्वस्त बागा उभ्या करण्या साठीचा आराखडा मनात तयार होवू लागला.
निसर्ग सहयोग अभियानाचे बीजा रोपण झाले होते.
आडे गांवातील बागायतदार प्रतिनिधी, मी, राहूल मंडलीक आमची चर्चा होऊन तात्काळ गरज म्हणून श्रेडींग मशिने उपलब्ध करून बागातील ओला कचरा बारीक करून तो बागेतच पसरून जागेवरच कंपोस्ट करावे असे ठरले.
श्रेडींग मशीन साठी आर्थीक मदत मिळवून कोळथरे ते वेळास या भागात दोन-तीन गांवात मिळून एक श्रेडींग मशिन अशी एकूण ५ मशिनचे उद्दिष्ट ठेवून काम सुरू झाले.
श्रेडींग मशिन उत्पादक श्री. चुडेकर यांचेशी संपर्क साधला. त्यांना मशिनची गरज लक्षात आल्याने दोन दिवसात मशीन घेऊन ते स्वतः आले. एकही पैसा त्यांना दिला नसतानांही केळशीत मशिनचे प्रात्यक्षिक व मशीन वापरण्या साठी आवश्यक सूचना देऊन मशीन ठेवून निघून गेले.
केळशी मधे दिलेल्या या मशीनचा सुयोग्य वापर सर्वांसाठी होईल याची जबाबदारी प्रात्यक्षीका साठी उपस्थीत बागायतदारातील श्री. उदय जोशीं यांनी घेण्याचे ठरून, आवश्यक स्पॅनर, स्पेअर्स सह मशीन श्री.ऊदय जोशी यांचे ताब्यात देण्यात आले. जास्तीत जास्त बागायतदार याचा लाभ घेत असतील अशी आशा आहे.
या दरम्यान श्री. जयंत भावे दापोली, श्री. रमेश जोशी मुंबई अशि मंडळी एकत्र येवू लागली व सर्व गोष्टींच्या समन्वया साठी ‘निसर्ग सहयोग अभियान‘ व्हॉस्टस् अप गट श्री. राहूल मंडलीक कार्यरत केला.
गत २१ दिवसांच्या च्या काळात
१ ) केळशीतील बागायतदारांनी श्रेडींग मशीन ची उपयुक्तता व गुणवत्ता मान्य केली.
२ ) आज रोजी ४ श्रेडींग मशिन देणारे दाते निश्चीत झाले.
३ ) श्री. चुडेकर यांनी पुढील ३ मिशन जोडणीचे काम सुरू केले आहे. येत्या तीन चार दिवसात मशीन तयार होतील.
केळशी: येथे वापरण्या साठी देण्यात आलेले मशीन हे डोंबीवली अखिलं चित्पावन महासंघ यांचे आर्थिक सहाय्याने आहे.
प्रस्तावीत श्रेडींग मशिने या प्रमाणे
वेळास: श्री. यशवंत काका जोशी पार्ले यांचे देणगी तून असेल.
आडे, पाडले: श्री. जयंत भावे यांचे प्रयत्नातून भावे कुलातील दाते व पाडले येथील श्री. मिलींद लिमये हे जमा करत असलेल्या रक्कमेतून,असेल.
आंजर्ले,मुर्डी: आंजर्ले येथील श्री. अतुल विद्वांस यांचे प्रयत्नातून त्यांचे मीत्र श्री. महेश आठल्ये मुंबई यांचे देणगीतून असेल.
कोळथरे, पंचनदी: श्री. रमेश जोशी, श्री. अशोक जोशी कोळथरे व पंचनदी येथून मिळणाऱ्या अर्थ साहाय्यातून, प्रस्तावित आहे. अर्थ सहाय्य निश्चीती झाल्या वर या चौथ्या मशीनच्या जोङणीचे सांगता येईल.
अशा तऱ्हेने पहिले उद्दिष्ट पूर्ण होणे दृष्टिपथात आहे.
शिवाय सुमारे २ लक्ष ३० हजार रुपये रोख स्वरूपात आडे,पाडले, केळशी, आंजर्ले गांवातून चाळीस एक गरजूंना आपत्कालीन म्हणून वितरीत केले. ( श्री. अशोकराव बेहरे यांनी पाठविलेले व श्री. राहूल मंडलीक यांचे कडे आलेल्या रक्कमेतून )
प्रस्तावित:
सुपारी, नारळ यांच्या खोडा पासून फर्निचर या पुढील उद्दीष्ट साध्यतेच्या दृष्टीने काम सुरू आहे.या ऊद्दीष्ट साध्यते साठी ही आर्थिक सहाय्याची गरज आहे.ती ही पूर्ण होईल असा विश्वास पहिल्या टप्प्याच्या यशस्वीते मुळे वाटत आहे.
तिसरा टप्पा आंतरपिक व सुपारी, नारळ लागवड या करिता कोंकण कृषी विद्यापिठाने प्रकल्प तयार केला आहे व त्याच्या अम्मल बजावणी साठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळविण्यासाठी ते प्रयत्न करत आहे.
शुभम् मंगलम्!
निसर्ग सहयोग अभियान सहयोगी
विनायक श्री. महाजन.
टिप: ही श्रेडींग मशीन तात्काळ मदत स्वरूपात असून त्या त्या गांवातील बागा प्राथमिक स्वरूपात साफ झाल्या की दांत्यांशी संपर्क करून मशीनच्या पुढील वापराच्या संदर्भात निर्णय निसर्ग सहयोग अभियान ने पारदर्शी पाध्दतीने घ्यावा असे वाटते.