- रिंगी/रिठा यांचे पाणी वाळवीचा त्रास नष्ट करते.
- नारळाचे पाणी/ नारळ वाटून त्याचे पाण्यातील मिश्रण फळांचा वाढीसाठी (आकार मोठा होण्यासाठी) उपयुक्त ठरते.
- जेष्ठमधाचा काढा पाण्यात मिसळून फवारल्यास फळास चकाकी येते.
- निवडुंगाचा चीक विष नाशक म्हणून काम करतो. (मुंगी, गांधीलमाशी चावल्या ठिकाणी त्वरित लावावा)
- गुळाचे पाणी फवारल्याने पिक वाढते.
- चुना, मोरचुद पाण्यात सुंभ, सुतळ भिजवून घेतल्यास त्याचे आयुष्य वाढते
- मोरचुदचे पाण्याने लाकडाचा टिकवूपणा वाढतो
- झाडाची फांदी तोडल्यास त्या जागी गाईचे ताजे शेण मळून घेवून टोपी सारखे बसवावे
- चंद्रोदया पूर्वी चार तास, भाद्रपद / फाल्गुनात झाडे तोडल्यास लागत नाहीत
- ताकाने सूत्रकृमी मरतात.
विनायक महाजन