आंबट नसतानांही खूप व्हीटॅमीन सी देणारे. डाएटरी फायबर्स युक्त, ओबेसिटी कमी करणारे पण…खाताना घशाला त्रास देणारे, रस काढला तरीही पिऊ शक्त नांही,घशाला त्रास होतो. हे त्रास देणारे ऑस्ट्रींजन्ट फळात नेमके कोठे असते?तर ते मुख्यत्वे करून फळाच्या मध्य भागी असते.
फळाचे उभे चार भाग करून (जशी फणसाची पाव काढतो तशी ) नीट निरीक्षण केल्यास मधला भाग वेगळा दिसतो तो सुरीने काढून टाकल्यास उर्वरीत भाग खाता येतो.अशा भागाचा रस काढून घेतला नंतर त्या त तुरटी फिरविली तर अर्ध्या तासाने घशाला त्रास देणारे ऑस्ट्रीजन्ट खाली बसते व वरचा रस पिण्या योग्य होतो.
असा रस रोज एक ग्लास पीण्याने अतिरीक्त वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय व्हीटॅमिन सी रोग प्रतिकारक शक्ती वाढविते.पाहूया करून, अनुभवांची देवाण घेवाण करूया.
या रसापासून आणखी काही पुढील वेळी.
विनायक महाजन