Category Archives: मंथन

Section for general discussion on farming and related topics.
शेती आणि तत्सम विषयांची चर्चा ह्या सदरात मांडता येईल…

वैदिक दिनदर्शिका १९४७

वैदिक दिनदर्शिकाच का ? – वाचा पृष्ठ १ प्रचलित पंचांगे किती धार्मिक ? पृष्ठ २ पंचांग आधारित उन्नत कृषी पृष्ठ ३ स्वास्थ्य रक्षणा साठी ऋतुचर्या या दिनदर्शिकेबाबतचे विचार, सूचना, त्यातील चुका – दुरुस्ती, आपली निरिक्षणे, आपल्या अपेक्षा, प्रतिक्रिया या सह आपला प्रतिसाद हे सर्व आमच्यापर्यंत जरूर पोचवावे.WA 9869413752 or eMail : vaidikdinadarshika@gmail.com

वैदिक दिनदर्शिका

आपण सर्वांनी निरामय जीवन जगावे या साठी विषमुक्त अन्न उत्पादन शेतकऱ्यांनी करावे व आपण ऋतुचर्या नुसार आचरण करावे या करीता ही वैदिक दिनदर्शिका उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. या दिनदर्शिकेबाबतचे विचार, सूचना, त्यातील चुका – दुरुस्ती, आपली निरिक्षणे, आपल्या अपेक्षा, प्रतिक्रिया या सह आपला प्रतिसाद हे सर्व आमच्यापर्यंत जरूर पोचवावे.WA 9869413752 or eMail : ramojoshi@gmail.com

उदकाची आरती – ऋषि पाराशर

कोणतीही भाषा ही माणसाला प्राप्त झालेले ज्ञान व्यक्त करण्यास समर्थ ठरते तीच एक महान भाषा मानली जाते. आज प्रचलित म्हणून वापरात नसली तरीही संस्कृत भाषेने असा आपल्या महानतेचा फार मोठा वारसा निर्माण केलेला आहे. प्राचीन माणसाची संस्कृती ही कृषीवर आधारित ! हे कृषीसंबंधीचे सर्व निरीक्षण, अंदाज, अनुमान, पध्दती वगैरे निरीक्षणावर सविस्तरपणे ग्रंथबध्द करून ठेवणारा थोर… Read More »

शेराचे झाड, Euphorbia tirucalli.

अत्यंत दुर्लक्षित झालेले झाड!पूर्वी शेतबांधावर आपले पूर्वज आवर्जून हे झाड लावायचे, किंवा अख्ख्या शेताला ह्याचे कुंपण असायचे. कारण पिकांवर पडणारे अनेक रोग हे झाड अडवून धरायचे! तसं बघीतले तर अत्यंत जहाल झाड, पण विनाकारण डिवचले तर! आमचे अख्खे बालपण शेराखाली खेळण्यात गेले, आमची आई फक्त शेराच्या झाडाला हात लावू देत नव्हती. याचा चिक डोळ्यात वगैरे… Read More »

ऋग्वेद : जलशास्त्राचा विस्मयकारी साठा

ऋग्वेद हा आपण आदिग्रंथ मानतो. वेद कुणी लिहीले हे माहित नाही म्हणून अपौरूषेय मानले जातात. ‘गुरू मुखात् विद्या’ ह्या पध्दतीने पिढ्यान् पिढ्या चालत आलेले हे ज्ञान महर्षी व्यासांनी प्रथम लिहून ठेवले. ऋग्वेदात एकंदर दहा मंडले आहेत. (आताच्या भाषेत त्याला प्रकरणे असे म्हणता येईल.) प्रत्येक मंडलात काही सूक्‍ते आहेत. प्रत्येक मंडलातील सूक्‍तांची संख्या ही सारखी नाही.… Read More »

आंबा मोहोर संरक्षण

दर वर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आंबा मोहोराचे पर्यायाने फळांचे मोठे नुकसान होतांना दिसून येते. पावसाळ्यात आंब्याच्या झाडाला सतत पाणी मिळत गेले तर अशा आंब्याच्या झाडाला उशिरा मोहोर येण्याची दाट शक्यता असते. आंब्याची फुले १० ते ४० सेंमी लांबीच्या गुच्छामध्ये येतात. प्रत्येक फुलाला पाच पाकळ्या असून त्यांची लांबी साधारणपणे ५ ते १० मिमी एवढी असे.… Read More »

शून्य बजेट नैसर्गिक शेती (Zero Budget Natural Farming)

झिरो बजेट नॅचरल फार्मिंग – ही पद्धत बनवली आहे प्रयोगशील शेतकरी सुभाषजी पाळेकर यांनी.  ⚜ कोणत्याही पिकाचा उत्पादन खर्च शून्य कसा आणायचा याची ही वैज्ञानिक पद्धत ⚜ कोणतीच गोष्ट विकत घेऊन शेतात वापरायची नाही हे तत्व, त्यामुळे शेतकरी कर्जमुक्त राहतो⚜ ४० लाखाहून अधिक शेतकरी आज ह्या पद्धतीने यशस्वी शेती करत आहेत⚜ शेतीत सिंचन असेल किंवा कोरडवाहू… Read More »

प्राचीन भारताचे जलशास्त्र

 जल संवाद भारतात ब्रिटीश राजवट येऊन स्थिरावण्यापूर्वी शतकानुशतके आपल्या ज्ञानातून आणि परंपरेतून भारतीय लोक ज्या जलविज्ञानाचा वापर आपल्या दैनंदिन गरजांसाठी करीत त्याचा थोडक्यात आढावा ह्या लेखात घेण्याचे योजिले आहे. तारापूरचे जेष्ठ अभियंता व प्राचीन शास्त्रांचे जाणकार कै. गो. ग. जोशी यांनी या विषयावर बरेच काम केले होते. त्यावर आधारीत त्यांचा लेख सन 1955 मध्ये शिल्पसंसार… Read More »

शेतकऱ्यांनी केव्हां, काय व का लावावे?

👉 दरवर्षी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी व जूनच्या पहिल्या आठवड्यात काकडी लावावी. म्हणजे जुलै, ऑगस्टमध्ये आणि ऐन थंडीत काकडीचे पैसे हमखास होतात. 👉 महाशिवरात्रीस कांद्याचे रोप टाकून कांद्याची पात गुढी पाडव्यास लावावी. म्हणजे उन्हाळ्यात व आषाढी एकादशीपर्यंत पातीचे पैसे होतात. 👉 १७ मार्च ते १९ मे किंवा हल्लीच्या बदलत्या पावसाच्या हवामानात मृग किंवा आर्द्रा… Read More »

हळद लागवड

भारतीय मसाल्यांमध्ये हळद एक महत्वपूर्ण मसाला पीक म्हणून ओळखले जाते. हळदीची लागवड १५ मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यात केल्यास उत्पादन चांगले मिळते. चांगले उत्पादन मिळण्यासाठी लागवडीपूर्वी शास्त्रीय दृष्टिकोनातून जमिनीची पूर्वमशागत करणे आवश्यक आहे. जमिनीची मशागत: जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ टक्केपेक्षा जास्त असावे.जमिनीची खोली २५ ते ३० सें.मी. असावी.कंद… Read More »