Category Archives: मंथन

Section for general discussion on farming and related topics.
शेती आणि तत्सम विषयांची चर्चा ह्या सदरात मांडता येईल…

देशी गोपालन, एक ध्यास..

खूप वेळेस देशी गोपालन हे हौस म्हणून अथवा कोणा व्यक्तीस मिळत असलेले आर्थिक बळ पाहून सुरु केले जाते. मुळात ते का करावे? कसे करावे ? याचे उत्तर अनेक लोकांना माहित सुद्धा नसते .या गोपालनात आमच्या अनुभवाने येणाऱ्या लोकांचे काही प्रकार आहेत १ ) शेतकरी२ ) माझ्या मोठ्या बंगल्याच्या द्वारात मला गाय पाहिजे३ ) दुग्धउत्पादन४ )… Read More »

निसर्ग सहयोग अभियान…

एक आढावा दि. ६ जून आडे गांवचे सुपुत्र श्री. अशोकराव बेहरे पुणे यांचा फोन आला “मी तुझे खात्यावर पैसे पाठवितो आहे त्याची रोख रक्कम घेऊन आडे,पाडले, केळशी, गांवात जा आणि गरजूंना रोख रक्कम दे. तसेच कुडावळे येथील गरजुंना पण रोख रक्कम देऊन मदत कर.” आडे त्यांचे गांव व कुडावळेत बेहरे आंबा बाग आहे म्हणून आपत्कालीन… Read More »

शेतमालातील रासायनिक अंश : समस्या आणि उपाय

हल्ली टोमॅटो, पत्ताकोबी, कोबीफ्लॉवर या फळभाज्या जनतेच्या लाडक्या बनलेल्या आहेत. मात्र, माझा एक शेतकरी मित्र टोमॅटोला ‘विषाचा गोळा’ म्हणतो, कारण टोमॅटो पिकावर अनेकवेळा म्हणजेच आठवड्यातून दोनदासुद्धा विषारी रसायनांची फवारणी केली जाते. मिरची, आलं, काकडी, कोबी इत्यादी भाज्यांचे आणि द्राक्ष, सफरचंदसारख्या फळांचेही थोड्याफार फरकाने असेच असते…” ‘मॅगी’ या पाकीटबंद अन्नामध्ये आढळलेल्या घटकांबाबत देशात भरपूर चर्चा झाली… Read More »

निसर्ग एक वादळ

वास्तविक निसर्ग ही एक परिपूर्ण रचना आहे. त्यात काही फुकट मिळत नाही व फुकट जातही नाही. निसर्ग नावाच्या वादळाने कोंकणात घडले आहे ते फार भयानक आहे. कदाचित निसर्गावर मात करण्याच्या मानवाच्या सुप्त आकांक्षेला एक जोरदार झटकाच निसर्ग वादळाने दिला आहे, आता तरी सुधर..!! कोंकणातील नगदी पिके सुपारी, नारळ, आंबा व काजू. या मधील सुपारी व… Read More »

माती करूया सुपीक!

या लेखामध्ये आपण माती परीक्षणाच्या काही सोप्या पद्धती तसेच जमीन प्रदूषणाची कारणे व उपाययोजना याविषयी माहिती घेऊ या. आपल्या शेतातल्या मातीमध्ये खत घालण्याची गरज आहे का नाही हे पाहण्याकरिता मातीचा कस तपासण्याच्या काही साध्या, सोप्या सहज करता येतील. अशा काही पद्धती खाली दिल्या आहेत. मातीचा एक मूलभूत गुणविशेष म्हणजे मातीची घडण. सर्वसाधारणपणे, मातीचे वर्गीकरण चिकणमाती,… Read More »

कर्ब नत्र गुणोत्तर = “हयूमस ” निर्मितीची गुरुकिल्ली

आपण बऱ्याच वेळा कृषी तज्ञांच्या तोंडून / लिखाणातून… ” कर्ब – नत्र ” या शब्दांविषयीचा उल्लेख ग्रहण अथवा वाचन केला असेलच…. ! तर , मग काय आहे ही “कर्ब – नत्र ” भानगड ? अन् तीचे जमीन सकस करणाऱ्या हयूमस निर्मितीत योगदान ते काय ? या विषयीचे थोडंसं गुह्यत्तम वर्म “घागर में सागर” या उक्ती… Read More »

काजु बोंड एक दुर्लक्षीत फळ

आंबट नसतानांही खूप व्हीटॅमीन सी देणारे. डाएटरी फायबर्स युक्त, ओबेसिटी कमी करणारे पण…खाताना घशाला त्रास देणारे, रस काढला तरीही पिऊ शक्त नांही,घशाला त्रास होतो. हे त्रास देणारे ऑस्ट्रींजन्ट फळात नेमके कोठे असते?तर ते मुख्यत्वे करून फळाच्या मध्य भागी असते. फळाचे उभे चार भाग करून (जशी फणसाची पाव काढतो तशी ) नीट निरीक्षण केल्यास मधला भाग… Read More »