Category Archives: शेतीत छोटे पण महत्वाचे

शेती विषयक काही अनुभव व काही सूचनांचे संकलन ह्या सदरात व्हावे

यूरियाला पर्याय दही

२ किलो देशी गायीचे दही बनवून त्यात एक तांब्याचा तुकडा १५ दिवस बुडवून ठेवावा. त्यानंतर त्यात पाणी मिसळून १ एकरात फवारावे. यामुळे पीक ४५ दिवस टवटवीत राहील. संपूर्ण सिक्कीम राज्यात देशी गाईच्या दहयाचा असा उपयोग खूप वर्षे केला जात आहे. शेतकरी बंधूनी या बाबतीतला आपला अनुभव जरूर कळवावा.. सौजन्य : विनायक महाजन (काका), कुडावळे.

आंबा बागेची काळजी..

आंब्याच्या झाडाच्या बुंध्या पासून साधारणतः १मीटर त्रिज्येच्या वर्तुळात काम करणारी मुळे नसतात. तेथून पुढे १ मीटर म्हणजे २ मीटर त्रिज्येच्या वर्तुळाच्या आतील भागात मुळे कार्यरत असतात. हा भाग समपातळीत ठेवावा. हा भाग समपातळी केल्या नंतर तो भाग खणु नये. पाला,पाचोळा याचे आच्छादन कायम ठेवावे. या भागात च खते द्यावीत. शेण खताचे अनेक फायदे आहेत, ते… Read More »

काही गोष्टी अनुभव घेण्यासाठी

रिंगी/रिठा यांचे पाणी वाळवीचा त्रास नष्ट करते. नारळाचे पाणी/ नारळ वाटून त्याचे पाण्यातील मिश्रण फळांचा वाढीसाठी (आकार मोठा होण्यासाठी) उपयुक्त ठरते. जेष्ठमधाचा काढा पाण्यात मिसळून फवारल्यास फळास चकाकी येते. निवडुंगाचा चीक विष नाशक म्हणून काम करतो. (मुंगी, गांधीलमाशी चावल्या ठिकाणी त्वरित लावावा) गुळाचे पाणी फवारल्याने पिक वाढते. चुना, मोरचुद पाण्यात सुंभ, सुतळ भिजवून घेतल्यास त्याचे… Read More »